Aditya Thackeray : अदित्य ठाकरेंकडून पुरावे दाखवत निवडणूक आयोगाची ‘पोलखोल’

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. (Mumbai) त्यामध्ये व्हिडिओ स्क्रिनींगवर प्रेजेंटेशनद्वारे निवडणूक आयोगाने मतदार यांद्यामध्ये काय घोळ केला आहे हे दाखलं.
Published by :
Varsha Bhasmare

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली. (Mumbai) त्यामध्ये व्हिडिओ स्क्रिनींगवर प्रेजेंटेशनद्वारे निवडणूक आयोगाने मतदार यांद्यामध्ये काय घोळ केला आहे हे दाखलं. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसह शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणचे थेट पुरावेच दिले. त्यांच्या या पत्रकार परिषदेमुळे आता महाराष्ट्रात विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे यांनी मेळावा सुरू होताच एक प्रझेंटेशन सुरू केले. मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, असा दावा यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. हा दावा करताना त्यांनी काही आकडेवारी सादर केली. सोबतच त्यांनी काही फोटो, मतदारांचे मतदान कार्ड सादर केले. हा कथित घोळ त्यांनी पुराव्यानीशी दाखवून दिला आहे. तसेच हा कथित घोळ थांबवायचा असेल तर गटप्रमुखांनी सावध राहायला हवे. तुमच्याकडे असलेल्या मतदार यादीतील नावांचे वाचन झाले पाहिजे. आपण या मतदारांना ओळखतो का? हे पाहिले पाहिजे, अशा सूचना केल्या.

नाव, मतदाराचे लिंग चुकीचे दाखवले

विरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी २, ५२, ९७० मतदार होते. ते मतदार विधानसभा निवडणुकीत २, ६३, ३५२ झाले. म्हणजेच १६, ०४३ मतांची वाढ काही महिन्यात झाली. वरळी मतदारसंघात १९, ३३३ मतदारांसंदर्भात गडबड आहे. वरळीत ५०२ मतदार अशी आहेत ज्यांची नावं जवळपास सारखीच आहेत. गिरीश गजानन म्हात्रे या मतदाराच्या वडिलांचे नाव भानजी पटेल असे आहे. गौरी गगन गुप्ता, तेजश्री हडकर या महिला मतदाराचे लिंग पुरुष असल्याचे दाखवले आहे. ६४३ मतदारांचे लिंग चुकीचे दाखवल्याचे सापडले आहे, असे पुरावे साद करत आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीत गडबड आहे, असा आरोप केला.

काही मतदान कार्डावर एकाच ठिकाणी अनेक लोक राहतात

वरळी मतदारसंघात ४१७७ असे लोक मिळाले ज्यांचा काहीही ठावठिकाणा नाही. ६७ मतदार असे आहेत ज्यांच्या घराचा पत्ता फक्त झो झो झो लिहलाय. एका ठिकाणी एकाच खोलीत 38 मतदार असल्याचे दाखवण्यात आले आहे. ३८ मतदार हे एका खोलीत राहतात. हे फक्त वरळीत मतदारसंघापुरतं मर्यादित आहे. मुंबईत तर असे लाखो मतदार आहेत. काही मतदान कार्डांवर मतदारांचा फोटो नाही. काही मतदान कार्डावर एकाच ठिकाणी अनेक लोक राहतात. काही मतदारांचा मृत्यू झालेला आहे. एका मतदान कार्डावर तर मतदाराचे फक्त नाक दाखवण्यात आले आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या कथित अनियमितता शोधून काढल्या पाहिजेत, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी भाजपा, शिंदे यांची शिवसेना तसेच अजित पवार यांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com