Aaditya Thackeray X Post :  फ्रेंडशिपच्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना काढला चिमटा!

Aaditya Thackeray X Post : फ्रेंडशिपच्या शुभेच्छा देत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना काढला चिमटा!

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Aditya Thakarey on Devendra Fandvis : महाराष्ट्राचे राजकारण सध्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पाहायला मिळत आहे. माजी कृषीमंत्री आणि आताचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर राजकीय वर्तुळांतून पडसाद उमटले. विरोधकांकडून जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तरी सरकारने त्यांच्या राजीनामा न घेता खाते बदल केली. कृषी खाते काढून त्यांची नियुक्ती क्रीडामंत्री म्हणून केली. तसेच दत्तात्रय भरणे यांना नव्या कृषिमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी हॅप्पी फ्रेंडशिप डेच्या दिवशी पोस्ट टाकत फडणवीसांना डिवचलं आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या रविवारी फ्रेंडशिप असतो. आज दिवसभर सर्वजण मैत्र-मैत्रिणींचे फोटो शेअर करत मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात. यामध्ये आता राजकीय नेते सुद्धा मागे राहिले नाही आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी त्याच्या एक्स अंकाऊटवर पोस्ट टाकत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्यांनी संजय शिरसाट यांचा एका कार्यक्रमातील शासकीय निधीच्या वाटपावर भाष्य करताना वादग्रस्त विधान केले. त्यांनी म्हटले, "पैसे सरकारचे आहेत, आपल्या बापाचे काय जातंय?" असा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

काय लिहिलयं आदित्य ठाकरेंच्या एक्स पोस्टमध्ये

मुख्यमंत्री शिंदे यांना आदित्य ठाकरेंचा फ्रेंडशिप डेचा टोला

या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

शिरसाट यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर करत आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये लिहिलं:

"हॅपी फ्रेंडशिप डे, मुख्यमंत्री @CMOMaharashtra. असे दोस्त असताना..."

आपली टीका पुढे नेत ठाकरेंनी लिहिलं:

"आता रम्मी खेळणाऱ्यांना क्रीडा खाते मिळतंय. या युती सरकारच्या हतबलतेमुळे, पुढे यांना अर्थखातंही मिळेल, आश्चर्य वाटू नये!"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com