Aditya Thackeray : मातोश्री परिसरात ड्रोन फिरल्या प्रकरणी आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, काय म्हणाले?

Aditya Thackeray : मातोश्री परिसरात ड्रोन फिरल्या प्रकरणी आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, काय म्हणाले?

मातोश्रीच्या परिसरात एक ड्रोन अचानक घिरट्या घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

  • सर्वे घरांमध्ये डोकावण्याची आणि पकडल्यावर पळून जाण्याची परवानगी देते?

  • मातोश्री परिसरात ड्रोन फिरल्या प्रकरणी आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे

मातोश्रीच्या परिसरात एक ड्रोन अचानक घिरट्या घालतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. (Aditya Thackeray) ठाकरे गटाचे नेते अनिल परब, सचिन अहिर आणि इतर काही नेत्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. आज सकाळी आमच्या निवासस्थानात डोकावणारा एक ड्रोन पकडला गेला आणि जेव्हा माध्यमांना याची माहिती मिळाली, तेव्हा @MMRDAOfficialने स्पष्टीकरण देत. हा बीकेसीसाठी केला जाणारा सर्वे आहे. हा सर्वे मुंबई पोलिसांची परवानगी घेऊन करण्यात आला. ठीक आहे असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. कोणते सर्वे घरांमध्ये डोकावण्याची आणि पकडले गेल्यावर ताबडतोब पळून जाण्याची परवानगी देते? रहिवाशांना याची पूर्वसूचना का दिली नाही? संपूर्ण बीकेसीसाठी MMRDA फक्त आमच्या घराचा सर्वे करत आहेत का? MMRDA ने त्याऐवजी जमिनीवर उतरून त्यांच्या भ्रष्टाचाराचे एक उदाहरण असलेल्या एमटीएचएल (अटल सेतू) सारख्या बनावट कामावर लक्ष केंद्रित करावे. तसेच जर पोलिसांनी परवानगी दिली असेल, तर रहिवाशांना याची माहिती का दिली नाही? असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

ठाकरे घराण्याचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात अचानक ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती समोर आली आहे. हे ड्रोन कोणी उडवले आहेत? त्यामागचा हेतू नेमका काय आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. मातोश्री परिसरात ड्रोनच्या अचानक घिरट्या घालतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com