ऍड.ओवेस पेचकर यांनी केली भाटिया गाळ समस्येची पाहणी

ऍड.ओवेस पेचकर यांनी केली भाटिया गाळ समस्येची पाहणी

१५ दिवसात काम सुरू न झाल्यास उच्च न्यायालयाचे दार ठोठवणार.
Published by  :
Sagar Pradhan

निसार शेख|चिपळूण: भाटिया खाडी साचलेला गाळ राजिवडा,भाटे,कर्ला आणि फणसोप या परिसरातील मच्छीमारांना डोकेदुखी बनली आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून हा प्रश्न आता मच्छीमारांसाठी भवितव्याच्या दृष्टीने अडचणीचा ठरणार आहे. नुकतेच झालेल्या जनता दरबारामध्ये रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ गाळ उपसावा असे आदेश दिले आहे. मात्र डिम्म असणारे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. या विषयाच्या अनुषंगाने उच्च न्यायातील वकील ऍड.ओवेस पेचकर यांनी आज भाटिया समुद्राला भेट देत मच्छीमारांच्या समस्या विषयी माहिती जाणून घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेत असणारा त्यांच्यामध्ये असणारा उद्रेक लक्षात घेता संबंधित प्रशासनाने यावर पंधरा दिवसात कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार आता मच्छिमारांनी केला आहे.

जमातून मुस्लिम राजवडा कोरम कमिटी पुरस्कृत मच्छिमार संघर्ष समितीच्या प्रमुखांनी नुकतेच ऍड.ओवेस पेचकर यांची भेट घेऊन त्यांना मच्छिमारांच्या समास्या समजावून सांगितल्या त्यांनी प्रत्यक्षात मुबंईतून उपस्थित राहून भाटिया समुद्राची पाहणी केली.या गाळामुळे अनेक बोटिंचे नुकसान झाले असून मच्छिमारांना याचा भुदंड पडला आहे.यापूर्वी ही शासनदरबारात या विषयी पाठपुरावा करण्यात आला आहे.मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.मात्र संबंधित विभागाने १५ दिवसात जर गाळ उपसा सूरू केला नाही तर ऍड.ओवेस पेचकर यांच्या माध्यमातून मा.उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा निर्धार आता मच्छिमार वर्गाने केला आहे.यावेळ ऍड.ओवेस पेचकर,माजी नगरसेवक सुहेल मुकादम,शब्बीर भाटकर,नजीर वाडकर उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com