ताज्या बातम्या
Prasad Purohit : बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्ततेनंतर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित पुण्यात दाखल
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्ततेनंतर ले. कर्नल पुरोहितांचे पुण्यात जल्लोषात स्वागत
मालेगावामधील भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2009 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तब्बल 17 वर्षांनी निकाल लागला. यामध्ये प्रकरणातील सात संशयितांना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्क्ता केली. दरम्यान माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांचा देखील समावेश होता. त्यानंतर दोन्ही निर्दोष मुक्क्ता केलेल्या व्यक्तींच्या घरासमोर पतित पानव संघटनेकडून जल्लोष करण्यात आला.
आज पुणे निवासस्थानी ले. कर्नल प्रसाद पुरोहितांचं जंगी स्वागत करण्यात आले होते. पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पुण्यातील निवासस्थानाच्या बाहेर जल्लोष पाहायला मिळाला आहे.