Dombivali
DombivaliTeam Lokshahi

कल्याण ग्रामीण पाठोपाठ डोंबिवलीतील 38 बिल्डरांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रंच्या आधारे मिळविली इमारतीच्या बांधकामांची परवानगी
Published by :
Sagar Pradhan

कल्याण ग्रामीणमधील 27 बिल्डरांच्या विरोधात पोलिस कारवाईनंतर आत्ता डोंबिवलीतील 38 बिल्डरांच्या विरोधात रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केडीएमसीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेची खोटी परवानगी मिळविल्याचा आरोप आहे.

Dombivali
इंदाला इन्व्होशन अँड इन्क्यूबेशन सेंटर विद्यार्थ्यांसाठी खुले

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत बेकायदा बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पूर्वीही हायकोर्टाने केडीएमसीला फटकारले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संदीप पाटील यांचा आरोप आहे की, बनावट कागदपत्रे सादर करुन खोटया सहीशिक्याच्या आधारे रेराचे प्रमाणपत्र मिळविले आहे.

संदीप पाटील यांच्या आरोपानंतर केडीएमसीने या तक्रारीची चौकशी केली असता. संदीप पाटील यांच्या आरोपात तथ्य आढळून आले. अखेर डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्यात 27 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारे बनावट कागदपत्रंच्या आधारे इमारत बांधकामाची परवागनी मिळवणाऱ्या 38 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. याचा तपास पोलिस करीत आहे. आत्तार्पयत 65 बिल्डरांच्या विरोधात या गुन्हा दाखल झाल्याने कल्याण डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com