Pune News

Pune News : ‘Operation Sindoor’ नंतर देशात हायअलर्ट; पुण्यात ड्रोन व इतर हवाई उपकरणांवर बंदी

पुणे हायअलर्ट: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर ड्रोन आणि हवाई उपकरणांवर बंदी, सुरक्षा उपाययोजना कडक.
Published by :
Team Lokshahi
Published on

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला. या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' Operation sindoor हे नाव देण्यात आले. या मिशननंतर निर्माण झालेल्या तणावापूर्व वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहारात हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. शस्त्रसंधीमुळे दोन्ही देशांमधील तणाव काहीसा निवळला असला, तरी पाकिस्तान किंवा दहशतवादी गटांकडून संभाव्य हल्ल्याचा धोका कायम असल्याचे प्रशासनाच्या निरीक्षणात आले आहे.

याचपार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात सुरक्षेची कडक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. १२ जून २०२५ पर्यंत ड्रोन drone, रिमोट कंट्रोल विमान Remote Control Plane, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट Microlight Aircraft, पॅरामोटर Paramotor, पॅराग्लायडर Paraglider, हँग ग्लायडर Hang glider, हॉट एयर बैलून Hot air balloon यांसारख्या हवाई उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असल्याचे पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतही पोलिस यंत्रणा सतर्क झाल्या असून, सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे तसेच गर्दीच्या सार्वजनिक भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर अलीकडेच झालेल्या घडामोडींमुळे हा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानने जम्मू, पंजाब व राजस्थान सीमांवर हालचाली वाढवल्यानंतर भारतानेही लाहोर, कराची आणि इस्लामाबादमधील ठिकाणी ड्रोनद्वारे ठोस प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर काही भागांत ब्लॅकआउटही करण्यात आले. या साऱ्या घटनांचा विचार करता पुणे व मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये हल्ल्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी नागरिकांना जागृत राहण्याचे आवाहन केले असून, कुठल्याही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्तीची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com