भारताने पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाउंट्स बॅन केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये भारतातील 'या'  गाण्यांवर घालण्यात आली बंदी

भारताने पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाउंट्स बॅन केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये भारतातील 'या' गाण्यांवर घालण्यात आली बंदी

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं कारवाई केली. पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे. या यादीत हानिया आमिरपासून ते इम्रान अब्बासपर्यंतच्या सेलिब्रिटींची नावं आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता सेलिब्रिटींचे अकाउंट्स बॅन केल्यानंतर पाकिस्तानने देखील लता मंगेशकर यांच्यासह अनेक गायकांच्या गाण्यांवर बंदी घातली आहे. पाकिस्तान सरकारने 1 मे रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली असून आता पाकिस्तानमध्ये बॉलिवूड गाण्यांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग असोसिएशनचे सरचिटणीस शकील मसूद यांनी म्हटले आहे की, देशभरातील पाकिस्तानी एफएम रेडिओ स्टेशनवरून भारतीय गाण्यांचे प्रसारण तात्काळ बंद करण्यात आले आहे.

भारतीय गाणी, विशेषतः लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश यांसारख्या गायकांची गाणी, पाकिस्तानी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत आणि येथील एफएम रेडिओ स्टेशनवर दररोज वाजवली जातात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com