Delhi News : नव्या कारची पुजा पडली महागात!
Delhi News : नव्या कारची पुजा पडली महागात! काही घडलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का Delhi News : नव्या कारची पुजा पडली महागात! काही घडलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Delhi News : नव्या कारची पुजा पडली महागात! काही घडलं ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

पारंपरिक विधीचा फटका: थार गाडीचा अपघात, महिला गंभीर जखमी
Published by :
Riddhi Vanne
Published on

दिल्लीच्या प्रीत विहार परिसरातील महिंद्रा थारच्या शोरुममध्ये एका महिलेच्या आनंददायी क्षणाचं दुःखद अपघातात रूपांतर झालं. महिला आपल्या कुटुंबासह तब्बल 27 लाख रुपयांची थार घेण्यासाठी शोरुममध्ये आली होती. गाडी खरेदी केल्यानंतर तिने पारंपरिक पद्धतीनं नजर उतरवण्यासाठी लिंबू फोडण्याचा विधी करण्याचं ठरवलं.

पूजेनंतर महिलेने गाडी सुरु करून चाकासमोर ठेवलेला लिंबू फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तिने अचानक ऍक्सिलेटर दाबल्याने थारने जोरदार वेग घेतला. काही क्षणांतच गाडीवरील तिचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव थार शोरुमची काचेची भिंत तोडत पहिल्या मजल्यावरून खाली रस्त्यावर कोसळली. अंदाजे 15 फुटांवरून पडलेली ही गाडी उलटी झाली.

या अपघातात गाडीतील महिला गंभीर जखमी झाली. मात्र, एअरबॅग्स उघडल्यामुळे तिचा जीव वाचला. शोरुममधील कर्मचारी आणि कुटुंबीयांनी तिला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्यावर तिला घरी सोडण्यात आलं. सुदैवानं या अपघातात शोरुममधील अन्य कर्मचारी आणि ग्राहक यांना कोणतीही इजा झाली नाही.

पोलिस उपायुक्त अभिषेक धानिया यांनी सांगितलं की, या घटनेत अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. अपघाताची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असून, पारंपरिक प्रथेमुळे इतकी मोठी दुर्घटना कशी घडली यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com