Virat Kohli
Virat Kohli

Virat Kohli : मोठी बातमी: रोहितनंतर आता विराट कोहलीही घेणार कसोटीतून निवृत्ती?

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
Published on

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 7 मे रोजी त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. यातच आता रोहित पाठोपाठ क्रिकेटच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.

रोहित शर्मानंतर आता विराट कोहलीनेही (Virat Kohli )कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत असून त्याने याबद्दल बीसीसीआयलाही सांगितल्याचे बोलले जात आहे. मात्र विराट कोहलीने अद्याप निवृत्तीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

टीम इंडिया आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. आगामी इंग्लंडसारखा महत्वाचा दौरा असून निवृत्तीबाबत फेरविचार करावा, अशी विनंती बीसीसीआयने विराट कोहलीला केली आहे. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत. विराट कोहलीला बीसीसीआयकडून निवृत्तीचा फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com