Manoj Jarange Maratha Protest : उपोषणानंतर जरांगे छत्रपती संभाजीनगरला रवाना
Manoj Jarange Maratha Protest : उपोषणानंतर जरांगे छत्रपती संभाजीनगरला रवाना; प्रकृती नाजूक असल्याची माहिती Manoj Jarange Maratha Protest : उपोषणानंतर जरांगे छत्रपती संभाजीनगरला रवाना; प्रकृती नाजूक असल्याची माहिती

Manoj Jarange Maratha Protest : उपोषणानंतर जरांगे छत्रपती संभाजीनगरला रवाना; प्रकृती नाजूक असल्याची माहिती

उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे मुंबईहून छ. संभाजीनगरला रवाना झाले आहेत. रात्री उशिरा संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल झाले आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मुंबईत आंदोलन सुरू केलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावरील त्यांच्या या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आठपैंकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानंतर मनोज जरांगेंनी आपले उपोषण सोडले. दरम्यान सीएसएमटी परिसरात आंदोलकांमध्ये जल्लोषात वातावरण निर्माण झाले आहे.

उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे मुंबईहून छ. संभाजीनगरला रवाना झाले आहेत. रात्री उशिरा संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात रात्री उशिरा दाखल झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून त्यांना किमान 2 आठवड्यांचा आराम घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच गॅलेक्सी रुग्णालयाबाहेर अधिक सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com