पूर्वीच्या आणि मागासवर्गीय आयोगामध्ये फरक : संभाजीराजे छत्रपती

पूर्वीच्या आणि मागासवर्गीय आयोगामध्ये फरक : संभाजीराजे छत्रपती

माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत बैठकीतील तपशील मीडियासमोर मांडला.
Published by :
shweta walge

माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मागासवर्ग आयोगाची भेट घेतली. यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत बैठकीतील तपशील मीडियासमोर मांडला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोगाशी चर्चा केली. यावेळी संभाजी राजे यांनी मागासवर्ग आयोगाकडे एकूण 10 ते 12 प्रश्न मांडले. मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं? काय काय शक्यता आहेत? मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे, यावरही त्यांनी आयोगाशी चर्चा केली. आयोगाने संभाजी राजे यांचं म्हणणं सविस्तर ऐकून घेतलं. मात्र, त्यावर कोणतंही आश्वासन दिलं नाही, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

ते म्हणाले की, मी आयोगाकडे 10 ते 12 प्रश्न मांडले. हे प्रश्न माझे नाहीत. ते सर्व समाजाचे प्रश्न आहेत. मराठा समाजाला आरक्षण कसं मिळू शकतं? सर्वोच्च न्यायालयाचं रुलिंग कसं लागू होऊ शकतं? आदी प्रश्न आयोगासमोर मांडले. तसेच अनेक आंदोलनाच्या माध्यमातून लोक आरक्षणाची मागणी लावून धरत आहेत, याकडेही आयोगाचं लक्ष वेधलं. आयोगाने सर्व ऐकून घेतलं. आमच्याशी चर्चाही केली. मागासवर्गीय आयोग हा स्वतंत्र विभाग आहे. त्यांच्यावर कुणाचं बंधन नाही. त्यांना उद्या आणखी कोणी भेटू शकतं. त्यांनी आमचे प्रश्न ऐकून घेतले. पण त्यांनी उत्तर दिलं नाही. तसं देता येत नाही, असं संभाजीराजे म्हणाले.

विषय जितका सोपा दिसतो तितका सोपा नाही आम्हाला अभ्यास करावा लागेल,आजपासून काम सुरू करणार अस सागितले. आम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने विचार करावा लागेल, असं आयोगाने मान्य केलं. आम्ही आजपासून सक्रिय होत आहोत, असं आयोगाने स्पष्ट केल्याचं संभाजीराजे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, आज आयोग ऑफीसला जाऊन भेट दिली, आयोगाचं ऑफिस हजार फूटही नाही, सरकारला विनंती आहे की मागासवर्गीय आयोगाला पैसे दिल्याशिवाय आयोग चालणार नाही. आयोग स्ट्राँग करावा लागेल. आयागोकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर ते काम कसं करतील? सरकारने त्यांना तात्काळ सुविधा द्याव्यात. युद्धपातळीवर सुविधा द्या. त्याशिवाय त्याचा काहीच अर्थ नाही, असंरही त्यांनी स्पष्ट केलं.

मी छगन भुजबळ यांना भेटलो त्यावेळी त्याचा अभ्यास पाहून शाहू महाराज यांचे अभ्यासक वाटले,पण मला कालच भाषण ऐकून पश्चाताप झाला आहे. भुजबळ यांनी काल लिमिट सोडले आहे, तो माझ्यासमोर येऊ दे मी सांगतो आले तर विचारेन, असं म्हणत त्यांनी छगन भुजबळांनर निशाणा साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com