हिंगोलीत मराठा समाज आक्रमक; कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याची घेतली शपथ

हिंगोलीत मराठा समाज आक्रमक; कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याची घेतली शपथ

हिंगोलीत मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

हिंगोलीत मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. बाभळीमधील मराठा समाजाचा मतदानावर बहिष्कार टाकला आहे. कुठल्याही पक्षाला मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली आहे.

सरकारने मराठ्यांना न टिकणारे दहा टक्के आरक्षण देऊन मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप हिंगोलीच्या बाभळी गावातील मराठा समाज बांधवांनी केला आहे. कोणत्याही पक्षाला लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार नसल्याची शपथ गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आली आहे.

यावेळी शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com