AI AC Tickets Fraud : AI चा वापर करुन चक्क तयार केला AC Local चा पास
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जिथे अनेकांची कामे सुलभ झाली आहेत, तिथे त्याचा गैरवापर करून गुन्ह्यांची नवीन रूपंही समोर येत आहेत. याचाच ताजा नमुना मुंबईच्या मध्य रेल्वेत पाहायला मिळाला, जिथे एआयचा वापर करून बनावट एसी लोकल पास तयार करणारे तीन प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हाती सापडले. रेल्वे प्रशासनाने या तिघांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे.
काय घडलं नक्की?
२८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ६.४५ ची परळ–कल्याण एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. टीटीई प्रशांत कांबळे आणि आरपीएफ कर्मचारी प्रवाशांची तिकिटे तपासत होते. त्या वेळी एक तरुणी आणि दोन युवकांनी आपला सीझन पास मोबाइलवर फोटो स्वरूपात दाखवला.
संशयास्पद गोष्ट म्हणजे
पास यूटीएस अॅपमध्ये उघडत नव्हता
फोटो थेट फोनच्या “डॉक्युमेंट्स” फोल्डरमध्ये सेव्ह होता
QR कोड नव्हता
तिन्ही तिकिटांचे नंबर “XOOJHN4569” एकसारखे होते
एआयने तयार केलेली तिकिटे
शेवटी तपासात स्पष्ट झाले की हे पास कुठल्याही अधिकृत अॅपवरून घेतले नव्हते, तर एआयचा वापर करून कृत्रिमरीत्या तयार केले होते. प्रवाशांनी आपली चुकी मान्य केली नाही; मात्र अॅपमध्ये तिकीट उघडता न आल्याने त्यांचा भंडाफोड झाला. टीटीई कांबळे यांनी प्रवाशांचे मोबाईल नंबर सिस्टममध्ये तपासले असता कोणताही सीझन पास त्या नंबरवर इश्यू झालेला नसल्याचे आढळले. यामुळे फसवणूक निश्चित झाली. रेल्वे प्रशासनाने टीटीईचे कौतुक करत बनावट तिकीट रॅकेट रोखण्यातील या भूमिकेची प्रशंसा केली.
रेल्वेचा इशारा : बनावट तिकिटांचे प्रकरण वाढतेय
गेल्या काही दिवसांत अशा एआय-निर्मित पासचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मध्य रेल्वेने स्पष्ट इशारा दिला आहे की—
फक्त अधिकृत काउंटर
एटीव्हीएम मशीन
किंवा अस्सल यूटीएस अॅप

