राज्य सरकारचा मोठा निर्णय; समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार

राज्य सरकारचा मोठा निर्णय; समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार

समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच सिंदखेडराजा नजीक झालेल्या भीषण अपघातात २६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा करणार सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी सरकारने अनेक हेलिकॉप्टर कंपन्यांशी बोलणी सुरू केल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टर कंपनीशी करार झाल्यानंतर समृद्धी महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना हेलिकॉप्टरने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com