Air India Cancel All Flights To America About Heavy Snowstorm
Air India Cancel All Flights To America About Heavy Snowstorm

Air India Cancel All Flights : अमेरिकेत हिमवादळाचा इशारा; एअर इंडियाची उड्डाणे रद्द

जगातील अनेक भागांत थंडीने जोर धरला असून बर्फ पडण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतातील काही राज्यांप्रमाणेच अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी सुरू झाली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

जगातील अनेक भागांत थंडीने जोर धरला असून बर्फ पडण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतातील काही राज्यांप्रमाणेच अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत तिथे तीव्र हिमवादळ येण्याचा इशारा देण्यात आला असून, त्याचा फटका हवाई वाहतुकीला बसणार आहे.

या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २५ आणि २६ जानेवारी रोजी भारतातून न्यू जर्सीतील नेवार्ककडे जाणारी आणि तिथून परत येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या ईस्ट कोस्ट भागात प्रचंड थंडी आणि बर्फ पडण्याची शक्यता असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनीही उड्डाणे रद्द केली आहेत.

दरम्यान, उत्तर भारतातही हवामान बिघडले आहे. जम्मू-काश्मीरमधील कटरा परिसरात पाऊस आणि हिमवृष्टी सुरू असल्यामुळे श्री माता वैष्णो देवीची यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना कटरा येथेच थांबवण्यात आले आहे. हवामान सुधारल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. सध्या त्रिकुट पर्वत आणि मंदिर परिसर बर्फाने झाकला गेल्याने परिसर अतिशय मनोहारी दिसत असून, तेथे उपस्थित भाविकांना हा अनुभव विशेष वाटत आहे.

थोडक्यात

  1. जगभरातील अनेक भागांत थंडीने जोर धरला

  2. बर्फ पडण्याचे प्रमाण वाढले आहे

  3. भारतातील काही राज्यांप्रमाणे अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी

  4. पुढील काही दिवसांत अमेरिकेत तीव्र हिमवादळाची शक्यता

  5. हवामान विभागाने तिथे इशारा जारी केला

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com