Air India
Air India

Air India : दिल्लीहून उड्डाण घेताच एअर इंडियाच्या विमानात बिघाड; विमानाचं आपत्कालीन लँडिंग

दिल्लीहून उड्डाण घेताच एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Air India ) दिल्लीहून उड्डाण घेताच एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाला. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली विमानतळावर विमानाचं लँडिंग करण्यात आले.

विमानातील सर्व प्रवासी, कर्मचारी सुखरुप असून विमानाच्या इंजिन क्रमांक 2 मधील तेलाचा दाब अत्यंत कमी असल्याचे आढळून आले, ज्यामुळे त्वरित लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विमानाला दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे परत उतरवण्यात आले तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • दिल्लीहून उड्डाण घेताच एअर इंडियाच्या विमानात बिघाड

  • उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड

  • बिघाड झाल्याने विमानाचं आपत्कालीन लँडिंग

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com