Boeing : 6000 अपघात, 9000 मृत्यू तरीही बोईंग विमानांची खरेदी ? त्रुटीदेखील आल्या होत्या समोर पण...
अहमदाबादहून गॅटविक (लंडन) ला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हे विमान अमेरिकन कंपनी बोईंगने बनवलेले 787-8 ड्रीमलायनर होते आणि एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क डेटाबेसनुसार, बोईंग 787 विमानाचा हा पहिला अपघात आहे. हे विमान अमेरिकन कंपनी बोईंगने बनवलेले 787-8 ड्रीमलायनर होते आणि एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क डेटाबेसनुसार, बोईंग 787-8 विमानाचा हा पहिला अपघात आहे.
बोईंग 787 मध्ये समस्यांचा दीर्घ इतिहास आहे. २2023 मध्ये, लंडनला जाणाऱ्या 787 विमानात रेड लाइट लागला, ज्यामुळे विमानाला नवी दिल्लीत परत उतरवावे लागले. मे 2025 मध्ये, हैदराबादहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या लुफ्थांसाच्या विमानाने नोज व्हीलमध्ये समस्या आल्यामुळे उच्च वेगाने उड्डाण करण्यास नकार दिला. मे 2025 मध्ये, हैदराबादहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या लुफ्थांसाच्या विमानाने नोज व्हीलमध्ये समस्या आल्यामुळे उच्च वेगाने उड्डाण करण्यास नकार दिला.
आतापर्यंत जगभरात वेगवेगळ्या बोईंग विमानांचे सहा हजारांहून अधिक अपघात झाले आहेत. यापैकी चारशेहून अधिक अपघात अत्यंत प्राणघातक होते. या अपघातांमध्ये नऊ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये कोसळलेल्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाच्या अपघाताची ही पहिलीच घटना आहे, जी केवळ विमानाच्या ब्लॅक बॉक्सद्वारेच उघड होऊ शकते.
अमेरिकन कंपनी बोईंग आणि दुसरी युरोपियन कंपनी एअरबस या कंपन्या सध्या विमान निर्मितीमध्ये जगात वर्चस्व गाजवणाऱ्या कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्या व्यावसायिक विमाने बनवतात. न्यू यॉर्क टाईम्समधील एका वृत्तानुसार, युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिका सारख्या खंडांमध्ये फक्त बोईंग विमाने वापरली जातात.