Air India Plane Crash : अपघातग्रस्त Boeing 787 Dreamliner विमानाचं वैशिष्ट काय? जाणून घ्या..
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं असू हे विमान टेकऑफ करताना ही दुर्घटना घडली आहे. आज दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी विमानाचं उड्डाण झालं आणि टेकऑफनंतर 10 मिनिटातच विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाल्याची शक्यता वर्तावली जात आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात हा दुर्दैवी विमान अपघात झाला आहे. यादरम्यान आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. हे प्रवासी लंडनला जात असल्याची माहिती समोर येत आहे. तर या विमान अपघाताने धुराचे लोट बाहेर पडत आहेत.
मोठ्या प्रमाणावर जीवितहानीची शक्यता,बचावकार्य सुरु आहे. यादम्यानअधिक माहितीची प्रतीक्षा आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे अपघातग्रस्त विमानात असण्याची शक्यता आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले, अशी माहिती राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे. 7 अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या बचावकार्य सुरु असून अजूनही अधिकृत माहिती समोर आली नाही. अपघात झालेले एअर इंडियाचं जे Dreamliner 789 आहे, हे प्रवाशाचं खास पंसतीचे आहे. काय आहेत. त्या विमानाची वैशिष्टये जाणून घेऊया..
ड्रीमलायनरमध्ये विमानाची ही आहेत खास वैशिष्टये,
2012 मध्ये एअर इंडियांच्या ताफ्यात पहिले बोइंग 787 ड्रीमलाइनर आले होते. हे विमान जगातील सर्वात मोठे आणि अलिशान विमानांमध्ये मानले जाणारे हे विमान आहे. या विमानाची लांबी 56.70 मीटर विंग रूंदी 600 मीटर आहे, तर उंची 16.90 मीटर इतकी असून यामध्ये दोन इंजिन एवढी क्षमता आहे. या विमानाच्या इंधनाची क्षमता 1,26,206 मीटर आहे. कमाल वेग 954 किमी प्रतितास कमाल श्रेणी 13,620 किमी आहे. तर, बसण्याची क्षमता कमाल 254 प्रवाशांची आहे. दरम्यान या विमानाची निर्मीती बोईंग (यूएस कंपनी)च आहे . याची किंमत 2.18 हजार कोटी इतकी आहे.