Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती
Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमीPalghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

पालघर वायुगळती: बोईसर MIDC मध्ये 4 कामगारांचा मृत्यू, 1 जखमी
Published by :
Riddhi Vanne
Published on

पालघर येथील बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा भीषण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एमआयडीसीतील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड या औषधनिर्मिती कंपनीत वायू गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला असून आणखी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लॉट क्रमांक एफ–१३ वर असलेल्या या कंपनीत दुपारी तीनच्या सुमारास नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये वायू गळती झाली. यावेळी ‘एल बेंडोझोल’ नावाचे औषध उत्पादन सुरू होते. अचानक झालेल्या गळतीमुळे कंपनीतील आठ कामगार बाधित झाले. त्यांना तात्काळ जवळील शिंदे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र त्यातील चार कामगारांचा मृत्यू रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच झाला. उर्वरित चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर रोहन शिंदे, निलेश हाडळ यांच्यासह आणखी दोन जण जीवन-मरणाच्या संघर्षात असून त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहेत.

घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे कारखान्यांमधील सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत बोईसर–तारापूर एमआयडीसी परिसरात अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत असून कामगारांचा जीव धोक्यात येत आहे.

कारखान्यांकडून वेळेवर फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट तसेच सुरक्षिततेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे कामगारांना आपला जीव गमवावा लागत असल्याची टीका व्यक्त केली जात आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने या औद्योगिक वसाहतीतील दुर्घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. परिणामी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांपासून ते परिसरातील रहिवाशांपर्यंत सर्वांनाच जीव मुठीत घेऊन राहावे लागत असल्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com