Maharashtra Weather
Maharashtra Weather

Maharashtra Weather : महाराष्ट्रात हवेचा धोका वाढला! उपनगरांची स्थिती शहरांपेक्षा वाईट, 27 ठिकाणी प्रदूषणाची मर्यादा ओलांडली

मुंबईला नेहमी प्रदूषणासाठी दोष दिला जातो, पण ताज्या हवेच्या अहवालातून वेगळंच वास्तव समोर आलं आहे. शहराच्या मध्य भागापेक्षा उपनगरं आणि नवी मुंबईत हवा अधिक खराब असल्याचं दिसून आलं आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

मुंबईला नेहमी प्रदूषणासाठी दोष दिला जातो, पण ताज्या हवेच्या अहवालातून वेगळंच वास्तव समोर आलं आहे. शहराच्या मध्य भागापेक्षा उपनगरं आणि नवी मुंबईत हवा अधिक खराब असल्याचं दिसून आलं आहे. एकूण 27 परिसरांत हवेची स्थिती चिंताजनक ते धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.

नवी मुंबईतील नेरूळ भागात सर्वाधिक प्रदूषण नोंदवलं गेलं. विमानतळ परिसर, महापे, बीकेसी, घाटकोपर, मालाड यांसारख्या भागांतही स्वच्छ हवा मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांचा श्वास अधिक अडचणीत सापडला आहे.

लोकसंख्या वाढ, सतत सुरू असलेली बांधकामं, मेट्रो व रस्त्यांची कामं, कारखाने आणि वाहनांची प्रचंड गर्दी ही हवेच्या बिघडलेल्या दर्जामागची मुख्य कारणं ठरत आहेत. कागदावर उपाय असले तरी प्रत्यक्षात त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.

हवा अशीच दूषित राहिली, तर दमा, श्वसनाचे आजार आणि हृदयविकार वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शहरासोबत उपनगरांकडेही तात्काळ लक्ष दिलं नाही, तर मुंबई महानगराचा श्वास आणखी घुसमटण्याची भीती आहे.

हवेतील गुणवत्ता निर्देशांक

  • वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स- 170

  • घाटकोपर – 154

  • मालाड पश्चिम – 150

  • नेव्ही नगर कुलाबा – 149

  • भायखळा – 147

  • मझगाव – 138

  • कांदिवली पूर्व – 137

  • बांद्रा पूर्व – 135

  • सायन – 133

  • कुर्ला – 131

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com