Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण

Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Case Update) आज (29 नोव्हेंबर 2025) एक वर्ष झाले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Santosh Deshmukh Case Update) आज (29 नोव्हेंबर 2025) एक वर्ष झाले आहे. दरम्यान, देशमुख कुटुंबाचा आणि मस्साजोग ग्रामस्थांचा न्यायाचा लढा आजही सुरू आहे. प्रथम पुण्यस्मरण निमित्त आज मस्साजोग येथे कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणा एक वर्ष पूर्ण झाले. आठवणीने देशमुख कुटुंबाच्या डोळ्यातील आज हे अश्रू थांबत नाहीत.. आठवण या पावले पावले येतात कुठल्या आठवणी सांगायच्या असं म्हणत वैभवी ला भावनांवर झाल्या. एक वर्षात न्याय मिळाला नाही याची खंत ही वैभवीने व्यक्त केली.आठवणी प्रत्येक क्षणाला येतात.वडिलांनी आमच्यासाठी कमी भावासाठी समाजासाठी स्वप्न पाहिलं होत त्यांचा विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे.

गावात आजही संतोष देशमुख यांच्या हत्येची जखम ताजीच आहे. गावकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील वेदना आजच्या पुण्यस्मरणामुळे अधिकच ओसंडून वाहताना दिसतात. न्यायाची अपेक्षा आणि संतोष देशमुख यांच्या कार्याची आठवण — या दोन भावनांच्या छायेखाली आजचा स्मृतिदिन अत्यंत हळवा आणि भावुक होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com