Navi Mumbai Kalyan Connectivity : नवी मुंबई–कल्याण प्रवासात दिलासा; उड्डाणपूल प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात

Navi Mumbai Kalyan Connectivity : नवी मुंबई–कल्याण प्रवासात दिलासा; उड्डाणपूल प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात

नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार सुलभ होणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागांतून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे. ऐरोली- कटाई उन्नत मार्ग आता अंतिम टप्प्यात आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Navi Mumbai Kalyan Connectivity : नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवलीदरम्यानचा प्रवास लवकरच अधिक सोपा आणि जलद होणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. एमएमआरडीएतर्फे सुरू असलेला ऐरोली–कटाई उड्डाणपूल प्रकल्प आता जवळपास पूर्णत्वाच्या टप्प्यात आला आहे.

या प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून हा मार्ग सुरू झाल्यावर सध्याचा दीड तासांचा प्रवास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ऐरोली ते कटाई नाका दरम्यान चार मार्गिकांचा बोगदा तयार करण्यात आला असून त्यामुळे नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली यांमधील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे.

हा उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर जड वाहनांचा ताण कमी होईल आणि मुंबई–कल्याणदरम्यान थेट, वेगवान संपर्क मिळेल. त्यामुळे इंधनाची बचत होईल, वेळ वाचेल आणि प्रवाशांचा त्रासही कमी होणार आहे. 2018 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प देसाई खाडी आणि पारसिक टेकडीखालून जातो. एकूण सुमारे ७ किलोमीटर लांबीचा हा मार्ग मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

थोडक्यात

  • नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास लवकरच जलद आणि सोपा होणार आहे.

  • रोजच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत; ही बातमी दिलासादायक आहे.

  • एमएमआरडीएच्या ऐरोली–कटाई उड्डाणपूल प्रकल्पाची कामगिरी जवळपास पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे.

  • हा प्रकल्प रस्त्यावरचा वेळ आणि वाहतूक कोंडी दोन्ही कमी करणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com