ताज्या बातम्या
Sharad Pawar Ajit Pawar News : मुंबईतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काका- पुतण्या एकाच मंचावर
मुंबईत पवार काका-पुतण्या एकत्र: फडणवीसांसह चर्चेचा मंच.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार काका पुतण्याच्या बंद दाराआड होणाऱ्या चर्चांच्या बातम्या अनेकवेळा बाहेर आल्या आहेत. मात्र आज अजितदादा शरद पवारांशी सर्वांदेखत एका मंचावर मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसले.
मुंबईतील राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळे आणि अजित पवार चर्चेअंती निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान दिली होती. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावर दिसले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.