Ajit Pawar : सुप्रिया सुळेंवर थेट हल्ला करत अजित पवारांचा बारामतीकरांना भावनिक आवाहन

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंवर थेट हल्ला करत अजित पवारांचा बारामतीकरांना भावनिक आवाहन

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल.
Published by :
shweta walge

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. यावेळी त्यांनी बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल. त्यामुळे निवडणुकीला मतदान करताना भावनिकपणे विचार करु नका. भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. कामं ही तडफेनेच करावी लागतात, जोरकसपणे करावी लागतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. असं म्हणत अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन केले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला विक्रमी मतांनी निवडून दिले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून लीड मिळालं पाहिजे, अशा शब्दांत अजित पवार यांनी बारामती लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. तसेच विविध मुद्द्यांवरुन शरद पवार गटाच्या नेत्यांना लक्ष्य केले. आगामी काळात बारामतीचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार निवडून येणे, कसे महत्त्वाचे आहे, पटवून देण्याचा प्रयत्न मतदारांना केला.

आपण नुसते सेल्फी काढत फिरत नाही. कामे करण्याचा आपल्याला आवाका आहे. मी आणि माझा परिवार सोडला तर बारामतीमध्ये सगळेजण माझ्याविरोधात प्रचार करतील. इतरांसाठी एवढं करून मला एकटे पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी मला तुम्हा कार्यकर्त्यांची साथच आहे. तुमची साथ आहे तोपर्यंतच मी तडफेने काम करु शकतो, असे भावनिक आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत म्हणाले की, पार्लामेंटमध्ये नुसती भाषण करुन प्रश्न सुटत नाही. मीदेखील भाषणं करुन उत्तम संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवला असता आणि इथे कामं केली नसती तर बारामतीमध्ये कामं होऊ शकली असती का, असा सवाल अजित पवारांनी विचारला. काही जण सांगतील वर आम्हाला द्या, खालची निवडणूक आहे त्यांना मतं द्या. पण माझ्या उमेदवाराला डाग लागला तर राज्यात आणि देशाच्या राजकारणात माझी किंमत कमी होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंवर थेट हल्ला करत अजित पवारांचा बारामतीकरांना भावनिक आवाहन
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास ओबीसींना फायदा; असं कोण म्हणाले?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com