Ajit Pawar Deputy Chief Minister: अजित पवार होणार राज्याचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, जाणून घ्या त्यांची कारकीर्द

Ajit Pawar Deputy Chief Minister: अजित पवार होणार राज्याचे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री, जाणून घ्या त्यांची कारकीर्द

अजित पवार सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री होणार. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सविस्तर माहिती जाणून घ्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

23 तारखेला विधानसभेचा निकाल लागला त्या निकालात महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि त्यामध्ये भाजपने मोठ्या संख्येने जागा जिंकल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात पसंती पाहायला मिळाली. तर निकालानंतर आज 5 तारखेला महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5 वाजता शपथ घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच नाव पुन्हा एकदा कोरल गेलं आहे. अजित पवार हे आता सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदावर आपल नाव कोरनार आहेत. याचपार्श्वभूमीवर अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून कारकीर्द जाणून घ्या.

अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सहाव्यांदा पदाची शपथ घेणार आहेत. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे अजित पवार एकमेव नेते ठरले आहेत. अजित पवार 1991 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. अर्थमंत्री, जलसंपदामंत्री आणि ऊर्जामंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते सातत्याने निवडून येत आहेत. पण जलसंपदामंत्री असताना अजित पवार यांच्यावर सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. काँग्रेसची सत्ता असताना ते दोन वेळा उपमुख्यमंत्री झाले.

2019मध्ये अजित पवार यांनी भाजपशी युती करत पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण तीन दिवसांतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर स्वत:चे नाव कोरले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले त्यामुळे अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार बंड करून शिंदे सरकारमध्ये गेले आणि तिथे उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. त्यांच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला होता. आता ते पुन्हा 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधून विजय मिळवल्यानंतर अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची कारकीर्द

नोव्हेंबर 2010 - सप्टेंबर 2012 (काँग्रेस आघाडी)

ऑक्टोबर 2012 - सप्टेंबर 2014 (काँग्रेस आघाडी)

2019 मध्ये पहाटेचा शपथविधी 2019 (भाजप युती)

डिसेंबर 2019 ते जून 2022 (महाविकास आघाडी)

जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 (महायुती)

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com