Olympic Association Election Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवारांची अध्यक्षपदासाठी सलग चौथ्यांदा निवड

Olympic Association Election Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवारांची अध्यक्षपदासाठी सलग चौथ्यांदा निवड

अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड.. निवडणुकीत पवार यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित
Published by :
Prachi Nate
Published on

अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड झालीये. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे.

31 सदस्य संघटनांपैकी 22पेक्षा जास्त संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या पॅनेलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे हे तिघे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक न होता निवडले गेले.

महायुतीतील समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चेनंतर मुरलीधर मोहोळ यांच्या गटालाही काही पदे देण्याचे ठरले. या निवडणुकीत पवार यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित झाले असून, क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी ते पुढील दोन वर्षे काम करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com