Ajit Pawar
Ajit PawarAjit Pawar

Ajit Pawar : आधी लगीन नगरपालिकेचं, मग युगेंद्रचं, पवारांच्या घरातील लग्न कुठं आणि कधी जाणून घ्या....

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार विविध नगरपालिकांमध्ये प्रचार करत आहेत. परंतु त्याच वेळी पवार कुटुंबात दोन मोठ्या लग्नांची तयारी सुरू
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार विविध नगरपालिकांमध्ये प्रचार करत आहेत. परंतु त्याच वेळी पवार कुटुंबात दोन मोठ्या लग्नांची तयारी सुरू आहे. यंदा पवार कुटुंब निवडणुकीच्या रणभूमीऐवजी लग्नाच्या तयारीत अधिक व्यस्त दिसत आहे.

अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार 30 नोव्हेंबरला मुंबईत विवाह बंधनात अडकणार आहेत, तर जय पवार 5 डिसेंबरला बहरिनमध्ये विवाह करणार आहेत. यामुळे, जय पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची निवडणुकीच्या प्रचारात अनुपस्थिती आहे.

अजित पवार मात्र निवडणुकीच्या प्रचारात पूर्णपणे व्यस्त असून, राज्यभर प्रचार दौरे करत आहेत. अजित पवार यांच्या कुटुंबीयांची लग्नांची धावपळ असली तरी राजकीय जबाबदाऱ्या निभावण्यात अजित पवार तारेवरची कसरत करत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय.

या दरम्यान, राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार विविध मतदारसंघात प्रचार करत आहेत. त्यात, बहीण आणि निधी वितरणाचा मुद्दा उचलून मतदारांना आकर्षित करण्यात येत आहे. परंतु, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे अन्य वरिष्ठ नेते अजून सक्रियपणे प्रचारात दिसत नाहीत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com