ajit pawar funeral tomorrow in baramati vidya pratishthan
ajit pawar funeral tomorrow in baramati vidya pratishthan

Ajit Pawar Funeral Tomorrow : अजित पवारांना उद्या विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर अखेरचा निरोप

अजित पवार यांचे आज सायंकाळी बारामतीतील विद्या प्रतिष्ठाण परिसरात नागरिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवाला आज सायंकाळी बारामतीतील विद्या प्रतिष्ठाण परिसरात नागरिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

उद्या सकाळी अंत्ययात्रेला सुरुवात होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून ती पुढे जाईल. त्यानंतर विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या वेळी राज्यातील अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीचीही शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोक पसरला आहे. बारामतीसह अनेक ठिकाणी नागरिकांनी आपला दुःखभाव व्यक्त केला असून विधिमंडळातही त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

थोडक्यात

  1. विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची कथित बातमी सोशल मीडियावर पसरली आहे.

  2. ही अफवा समजताच संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  3. पार्थिवाला आज सायंकाळी बारामतीतील विद्या प्रतिष्ठाण परिसरात नागरिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे.

  4. नागरिक आणि सामाजिक वर्तुळ या बातमीला भावनिक प्रतिसाद देत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com