Karuna Munde On Ajit Pawar : 'अजित पवार गुन्हेगारी रोखण्यात अपयशी' करुणा मुंडेंची अजित पवारांवर टीका

बीडमधील गुंडाराजवर करुणा मुंडेंचा अजित पवारांना थेट सवाल
Published by :
Riddhi Vanne

बीडच्या परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती. शिवराज दिवटे असे या तरुणाचे नाव आहे. एका टोळक्याने त्याचे अपहरण करुन त्याला डोंगराच्या भागात नेले आणि बांबू आणि लाकडाने बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात (Beed Crime) एकच खळबळ माजली होती. मारहाण झाल्यानंतर शिवराज दिवटे (Shivraj Divte) गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचपार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी उपमुख्यंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या की, "बीडमध्ये जर गुंडाराज कमी होत नसेल तर, अशा लोकांचा एनकाउंटर केला तरच गुन्हेगारी कमी होईल. धनजय मुंडे यांचे मंत्रिपद बीडमधील इतर आमदाराला द्यावे अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळू मी देणार नाही."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com