Ajit Pawar in Baramati : राष्ट्रवादीतल्या बंडानंतर पहिल्यांदाच अजितदादा बारामतीत

अजित पवारांचा बारामतीत होणार नागरी सत्कार, शारदा प्रांगणात सत्काराची जोरदार तयारी.
Published by  :
Team Lokshahi

बारामती: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीयनाट्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्या बालेकिल्ल्याला भेट देणार आहेत. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर अजित पवार हे बारामतीला गेलेच नव्हते. अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच बारामती मतदारसंघातून केली होती.

बारामती येथील कसब्यातील कारभारी सर्कल पासून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून शारदा प्रांगणात संध्याकाळी त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. याच दिवशी अजित पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सुपे व माळेगाव येथे बांधण्यात आलेल्या पोलीस चौकीचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com