अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांची रडण्याची नक्कल; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांची रडण्याची नक्कल; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

शरद पवार यांच्याबाबत बोलताना रोहित पवार भावूक झालेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत शरद पवार यांच्याबाबत बोलताना रोहित पवार भावूक झाले. रोहित पवार भाषणात भावनिक झाले त्यानंतर दुसरीकडे अजित पवार यांनी त्यांच्या भाषणादरम्यान रोहित पवार यांची नक्कल केली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण #ED ची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत.

तसेच ते पुढे म्हणाले की, माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत… आणि त्यासाठी विचार, काळीज, जीवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा…. आणि हो… वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाण हृदयी नाही. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com