महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल; जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार म्हणाले...
Admin

महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल; जयंत पाटलांच्या विधानावर अजित पवार म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र तरीसुद्धा या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

त्यानंतर महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. यावरुन आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, सरकारला दहा महिने पूर्ण झालेत, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचं दिसत नाही. जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचं म्हणणं खरं ठरो. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com