‘या’ दिवशीच शरद पवार राजीनामा देणार होते; अजित पवार यांनी सांगितली तारीख
Admin

‘या’ दिवशीच शरद पवार राजीनामा देणार होते; अजित पवार यांनी सांगितली तारीख

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले गेले असल्याचे म्हटले जात आहे. पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबदद्ल पवारांनी या पुस्तकात भाष्य केल्याचे बोलले जात आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवारांकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असे शरद पवार म्हणाले. आता राष्ट्रवादीचे नवीन अध्यक्ष कोण ? पवारांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादी नेमकं कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी. आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे त्यांनी जाहीर केलं.

यावेळी अजित पवार म्हणाले की, हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. कालच 1 मे रोजी ते निर्णय जाहीर करणार होते. पण वज्रमूठची सभा होती. मीडियात तेच चाललं असतं. त्यामुळे 2 तारीख ठरली. त्यामुळे त्यांनी निर्णय जाहीर केला. त्यांच्या मनात आहे तीच गोष्ट करू असे अजित पवार म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, समितीने लोकांचा कौल काय आला ते लक्षात घेऊन पुढच्या गोष्टी ठरवाव्यात. ती कमिटी जे ठरवेल ते मला मान्य आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. कमिटी ही काही बाहेरची नाही. आम्ही सर्व बसू. चर्चा करू. तुमच्या भावना समजून घेऊ. पक्षाचा अध्यक्ष जो होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल. साहेब निर्णय मागे घेणार नाही. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com