Ajit Pawar On Walmik karad: कराडच्या फोटो प्रकरणावरून दादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Ajit Pawar On Walmik karad: कराडच्या फोटो प्रकरणावरून दादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

अजित पवारांनी वाल्मीक कराडच्या फोटो प्रकरणावर भाष्य करत कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. फोटो काढताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वाचा अधिक!
Published by :
Prachi Nate
Published on

यावेळी अजित पवारांनी वाल्मीक कराड यांच्या राजकीय नेत्यांच्या सोबत असलेल्या फोटो प्रकरणावरून भाष्य केलं, वाल्मीक कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. तसेच याची आम्हाला मोठी किंमत देखील मोजावी लागते असे देखील अजित पवार म्हणाले असून पुढे ते नर्मदा किसन ऍग्रो उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

आम्हाला याची किंमत मोजावी लागते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी... - अजित पवार

अजित पवार म्हणाले की, आम्हाला याची किंमत मोजावी लागते, कार्यकर्त्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे.. सध्या राजकारण काय चाललं आहे ते पहा सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो त्यामुळे सगळं आकरीतच घडत आहे. त्यामुळे कदाचित कोणाचा चुकीचा फोटो माझ्यासोबत आला, तर ते मला माहिती नव्हतं, तो चुकून काढला आहे असं मी सांगेल असं अजित पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, त्यामुळे आम्ही पोलिसांना देखील सूचना दिल्या आहेत, दोन नंबर वाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा, असे म्हणत अजित पवारांनी वाल्मीक कराडच्या फोटो प्रकरणावरून कार्यकर्त्यांना सल्ला दिला.

अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

पुढे अजित पवार म्हणाले की, अलीकडे गर्दी वाढत आहे, सगळ्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा असतो, पण फोटो नाही काढून दिला तरी नाराज होतात, आणि गडी बदलला असे म्हणतात, आणि अशातच एखादा नवीन गडी येतो, फोटो काढून जातो आणि वाटच लागते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढताय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी असा सल्ला देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com