अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे आज मतदान होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे आज मतदान होत आहे. अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क आज बारामतीमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. सातत्याने मी जनतेला सांगतोय ही भावकीची गावकीची निवडणूक नाही. पवार परिवारामध्ये सगळ्यात जेष्ठ, सगळ्यात वयाने जेष्ठ या आशाताई अनंतराव पवार आहेत. आज माझी आहे माझ्याबरोबर आहे. याची नोंद कृपा करुन सर्वांनी घ्यावी. मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनीपण मतदान केलं आहे. आम्ही आमच्या परिने व्यवस्थित महायुतीचा उमेदवार या नात्याने सर्वांनी सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केले.

प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या आरोपांचा धुरळा माझ्यावर उडवलेला आहे. मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिला नाही. मी पहिल्यापासून ठरवलेलं होते. विकासाला महत्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्यावर निवडणूक न्यायची. त्याप्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील तिथे पण सगळ्या बारामतीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आम्हाला निश्चितपणे एक विश्वास आहे. गेले अनेक वर्ष बारामतीच्या परिसरामध्ये केलेलं काम आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी गेले 10 वर्षामध्ये केलेलं काम याचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी यावा, राज्याचाही निधी मिळावा.

यासोबतच ते म्हणाले की, जनतेनं आजपर्यंत मला नेहमी साथ दिलेली आहे. या ही वेळेस साथ देईल. अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे आतापर्यंतचे काम केलेलं आहे. जिथे जिथे आता मतदान चाललेलं आहे त्या सगळ्या भागातील नागरिकांना, मतदारांना कि त्यांनी मतदानाच्या निमित्ताने बाहेर येऊन मतदान करावं. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com