Ajit Pawar : रोहितचा बॅलेन्स बिघडलाय, काहीही बडबडायला लागलाय

Ajit Pawar : रोहितचा बॅलेन्स बिघडलाय, काहीही बडबडायला लागलाय

अहमदनगरच्या सभेत रोहित पवार यांनी महायुतीवर आरोप केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अहमदनगरच्या सभेत रोहित पवार म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने पैशांचा पाऊस हा पलिकडच्या गटाकडून पाडला जात होता. त्याच्याबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट होती तिथे मोठ्या प्रमाणात गुंडाचासुद्धा वापर हा आपल्या विचाराच्या विरोधात तिथे केला होता.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, रोहितचा थोडासा बॅलेन्स बिघडला आहे. ते काहीपण बडबडायला लागलाय आता. मी एवढा हुशार नाही आहे उद्या तुम्ही प्रचार करत असता तुम्ही गुंड आहे की कोण आहे आम्हाला काही माहित नसते. आम्ही असलं धंदे कधी केलेलं नाही. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com