ajit pawar
ajit pawar

Ajit Pawar : विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तरच कामकाजात सहभागी होता येईल

आज विधानसभेचे विशेष अधिवेशन आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज विधानसभेचे विशेष अधिवेशन आहे. विधीमंडळात पुढील दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असून 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. यातच शपथविधी सुरु असताना विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले असून विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला आणि ईव्हीएमचा निषेध म्हणून आज विरोधक शपथ घेणार नाही आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तर परवा सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल.

परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळे करतोय, आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा केविलवाणा त्यांचा प्रकार चाललेला आहे. याला काही अर्थ नाही कारण सुरवातीला हे सगळे आत बसले होते पण नंतर आमच्या अर्ध्या लोकांची शपथ झाल्यानंतर ते बाहेर पडले. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com