अजितदादांची सुरक्षा कपात म्हणजे अघोषित हुकूमशाही : सचिन खरात

अजितदादांची सुरक्षा कपात म्हणजे अघोषित हुकूमशाही : सचिन खरात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला पुन्हा दणका दिलाय.
Published by :
Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला पुन्हा दणका दिलाय. विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत बदल झाले असून अनेकाच्या सुरक्षा काढून घेण्यात आल्या आहेत. शिंदे आणि फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजितदादा पवार यांच्या सुरक्षेत कपात केल्याचे समजत आहे.

आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते आहेत तसेच अजितदादा माजी उपमुख्यमंत्री, विधिमंडळ नेते होते तरीसुद्धा आदरणीय अजितदादा यांच्या सुरक्षेत कपात करणे म्हणजे अघोषित हुकूमशाही आहे म्हणून राज्य सरकारला प्रश्न विचारात आहे.

आपण सर्व प्रकल्प गुजरातला जाऊ दिले परंतु आता आपण महाराष्ट्र राज्यातील नेत्यांची सुरक्षा काढून गुजरात मधील नेत्यांना देणार आहे का ? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहे माननीय महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या सुरक्षेत कपात करू नये आणि जी सुरक्षा आदरणीय अजितदादा यांना तीच सुरक्षा कायम ठेवावी. असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com