शरद पवारांसोबतच्या गुप्त भेटीबाबत अजित पवारांनी स्पष्टच सांगितले
देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्या दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात नुकतेच पार पडले. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतच्या भेटीबाबत स्पष्टच सांगितलं आहे.
अजित पवार म्हणाले की, पुण्याच्या बैठकीच मनावर घेऊ नका. शरद पवार हे पवार कुटुंबातील ज्येष्ठ वडिलधारी व्यक्ती आहेत. मी त्यांचा पुतण्या आहे. हे मीडियावाले अशा भेटीला प्रसिद्धी देतात. त्यातून समज-गैरसमज निर्माण होतात. फार तिथे काही वेगळं घडलं असं समजू नका” असं अजित पवार म्हणाले. “जनतेला सांगेन, यापुढे केव्हाही भेटलो तर त्यातून कुठलाही अर्थ काढू नका. ती कौटुंबिक भेट असते मी लपून गेलेलो नाही, मी उजळ माथ्याने फिरणारा आहे” असं अजित पवार म्हणाले.
चोरडिया यांच्या दोन पिढ्यांशी आमचे संबंध आहेत. चोरडियांचे वडिल पवारसाहेबांचे वर्गमित्र होते. माझा कार्यक्रम चांदनी चौकात होता. व्हीएसआयसाठी शरद पवार पुण्यात होते. त्याचवेळी चोरडियांनी पवार साहेबांना जेवायला बोलावलं. जयंत पाटीलही पवारसाहेबांसोबत होते. जर दोन पिढ्यांपासून ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींनी जेवायला बोलावलं, तर त्यातून वेगळा अर्थ काढू नये असं अजित पवार म्हणाले.