Ajit PawarTeam Lokshahi
ताज्या बातम्या
Video : जेव्हा अजित पवार थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात...
अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना पाढे म्हणायला सांगितल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. कुठलाही कार्यक्रम असो, उद्घाटन सोहळा असो अजित पवार हे वेळेसह इतर गोष्टींची कडक शिस्त पाळतात. त्यांचे वेगवेगळे किस्से सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतात. शनिवारी अजित पवार सोलापूर दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यात त्यांनी मोहोळ तालुक्यातील पापरी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांच्यातील शिक्षक जागा झाला.
अजित पवारांनी या भेटीदरम्यान, वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चाचणी घेतली. इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्याला 9 व 12 चा पाढा म्हणावयास सांगितला. विद्यार्थ्याने तो लगेच म्हणून दाखवला. अजित दादांच्या परीक्षेत बडे बडे नापास होतात. मात्र हा विद्यार्थी पास झाला आणि पापरीची शाळा देखील गुणवत्तेमध्ये पास झालीय.