Ajit Pawar
Ajit PawarAjit Pawar

Ajit Pawar : "बाकीचे नेते आणि त्यांची..."बीडमधील सभेत अजित पवारांचा रोख नेमका कुणावर?

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका संपन्न होणार असून, प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. यामध्ये स्थानिक नेत्यांचे भवितव्य ठरवणारी मोठी लढाई सुरू आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Ajit Pawar) राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका संपन्न होणार असून, प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. यामध्ये स्थानिक नेत्यांचे भवितव्य ठरवणारी मोठी लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड आणि नांदेडमध्ये प्रचार सभा घेत, "मी काम करणारा माणूस आहे, आधी काम, नंतर शब्द," असे सांगत इतर नेत्यांवर टीका केली.

अजित पवार म्हणाले, "जनतेने मला सहा वेळा उपमुख्यमंत्री बनवलं, मंत्री बनवलं, विरोधी पक्षनेता केलं. कोरोना मुळे 2022 च्या निवडणुका उशिरा झाल्या, पण आता विकासकामांना गती देणं आवश्यक आहे. बीडमध्ये रेल्वे सुरू केली आहे, ती पुणे आणि मुंबईपर्यंत नेणार आहे. अंबाजोगाईसाठी 1000 कोटी रुपये निधी देणार आहे."

"बाकीचे नेते आणि त्यांची शहरं भिकारचोट असतात," अशी तिखली टीका करत, अजित पवार यांनी विरोधकांवर हल्ला बोलला. ते म्हणाले, "माझ्या कामावर आरोप होतात, पण मी नेहमी स्वच्छ आणि प्रामाणिक काम केलं."

लाडकी बहीण योजनेसाठी अपप्रचार सुरू असल्याचं सांगत, अजित पवार म्हणाले, "जर तुम्ही मतदान केलं तरच योजना सुरू राहील, असा अपप्रचार केला जात आहे. पण घाबरू नका, तुमचा लाडका भाऊ तुमच्यासोबत आहे," असं आश्वासन त्यांनी दिलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com