Ajit Pawar Untimely Death Halted The Campaigning Strict Shutdown In Karjat Neral Matheran
Ajit Pawar Untimely Death Halted The Campaigning Strict Shutdown In Karjat Neral Matheran

Ajit Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्रात शोककळा, कर्जत,नेरळ,माथेरान मध्ये कडकडीत बंद

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (28 जानेवारी 2026) सकाळी चार्टर्ड विमान अपघातग्रस्त झाले. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (28 जानेवारी 2026) सकाळी चार्टर्ड विमान अपघातग्रस्त झाले. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. कर्जत, नेरळ आणि माथेरानसह तालुक्यातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. व्यापारी संघटनांनी आवाहन करून जनतेला सहभागी होण्यास सांगितले. नेरळ आणि माथेरानमध्ये स्थानिक आणि निवडणूक प्रचारासाठी आलेले कार्यकर्ते देखील बाजार बंद करून श्रद्धांजली वाहिली.

महायुतीने या घटनेनंतर सर्व निवडणूक प्रचार कार्यक्रम रद्द केले आहेत. कोणतीही रॅली, सभा किंवा पदयात्रा आज होणार नाहीत. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि आदर व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक नेत्यांनी म्हटले की, “अजित पवार हे कणखर नेतृत्व आणि विकासाची ध्यास असलेले नेता होते. त्यांचे निधन मोठा धक्का आहे.” संपूर्ण तालुका या घटनेमुळे स्तब्ध असून, जनतेने एकसंधतेने आणि श्रद्धेने अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com