Ajit Pawar : अजित पवारांचा उद्या दिल्ली दौरा; कारण काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ajit Pawar) महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात होणार असून हे अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं जाणार आहे. विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळेल तसेच विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवरुन घेरण्याची शक्यता आहे.
यातच काल अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. अजित पवार एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी सायंकाळी दिल्लीला जात असून रात्री उशिरा पुन्हा नागपूरला परतणार असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून उद्याच्या दिल्लीवारीत अजित पवार यांच्या काही राजकीय भेटीगाठी होतात का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
अजित पवारांचा उद्या दिल्ली दौरा
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धनंजय मुंडेंसमवेत घेतली भेट
उद्याच्या दिल्लीवारीत काही राजकीय भेटीगाठी होतात का याकडे लक्ष
