Jayant Patil Meet Ajit Pawar : जयंत पाटील महायुतीसोबत येणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात वसंत शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज नियमक मंडळाच्या बैठकीदरम्यान, बैठक होण्याआधीच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. अजित पवार यांनी जयंत पाटील यांना केबिनमध्ये बोलावून घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे नाराज असल्याच्या चर्चां समोर येत होत्या. याचपार्श्वभूमीवर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नेमकी काय चर्चा होती याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे. याचपार्श्वभूमिवर अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"आमची चर्चा ही..." काय म्हणाले अजित पवार
अजित पवार म्हणाले की, "मिडीयाने काय बातम्या लावाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहुन बातम्या द्या. आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी आम्ही मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो. आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होतोय. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे. एआयचा वापर करुन ऊसाचे उत्पादन वाढले आहे".
"आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखाल करणार आहोत.आजची नेहमीप्रमाणे आमचे बैठक होती. एफ आर पी संदर्भात नक्की काय ऑर्डर झाली आहे हे आम्ही ऍडव्होकेट जनरल ला कलवल आहे नेमके काय ऑर्डर झाली आहे. याची माहिती आम्हाला देतील. हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे आमचं कर्तव्य आहे", असं अजित पवार म्हणाले आहेत.