चांगला पाहुणचार झाला, सुकट बोंबील, सुरमई बांगडा…अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिला 'हा' सल्ला

चांगला पाहुणचार झाला, सुकट बोंबील, सुरमई बांगडा…अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिला 'हा' सल्ला

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्या
Published by :
shweta walge

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार रविवारी पहाटेच रायगड पोहचले. त्यांनी रायगडमधील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांची सकाळीच शाळा भरवली.

अजित पवार म्हणाले की, निवडणुकीचा काळ आहे. राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. त्यातून पुन्हा एकदा उभारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायची आहे. ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे आपले स्लोगन असणार आहे. सगळ्यांनी चांगला पाहुणचार केला. सुकट बोंबील, सुरमई बांगडाची चव चांगली आहे. येथील लोकही चांगले आहेत, असेच खेळीमेळीच्या वातावरणात राहून सगळ्यांना विश्वासात घ्या. सर्वांनी एकत्र काम करा, असा नेतृत्वपणाचा सल्ला अजित पवार यांनी केला.

आपण महायुतीत गेलेलो आहे. उद्याच्या लोकसभेसाठी एनडीए माध्यमातून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व इतर सहकारी आपल्या सोबत असतील. महायुतीचा जो अधिकृत उमेदवार असेल, त्याला प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यायची आहे. देशाचं नेतृत्व करण्याची संधी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायची आहे. त्यासाठी जेवढे खासदार निवडून जातील तेवढी त्यांना मदत होणार आहे.

काम करत असताना नुसता विरोधी पक्षात राहून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी सरकारमध्ये असलो तर लोकांचे प्रश्न सोडवता येतात. मार्ग काढून निधी देता येतो. विकास काम करता येते. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे आहेत. मंत्रालयात असताना आदिती तटकरी आमच्याकडे विविध कामांसाठी पाठपुरावा करत असते. मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून हजारो कोटींची गुंतवणूक येणार आहे. नवीन रोजगार निर्माण होणार आहे. नमो रोजगार मेळावा लवकरच घेणार आहे. त्यासाठी सहा मोठे मिळावे घेणार आहेत. यामध्ये मोठे कंपन्या भाग घेतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com