Ajith Kumar Racing Accident Viral Video: तोल गेला अन्! दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग दरम्यान भीषण अपघात

Ajith Kumar Racing Accident Viral Video: तोल गेला अन्! दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग दरम्यान भीषण अपघात

दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग दरम्यान भीषण अपघात, व्हिडीओ व्हायरल. सुदैवाने अजित कुमार याला दुखापत झाली नाही. अधिक वाचा!
Published by :
Prachi Nate
Published on

दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार हा सध्या दुबई 24एच या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण घेत आहे. ही रेसिंग स्पर्धा 11 जानेवारी रोजी होणार आहे. दुबई 24एच ही एक टीम रेसिंग स्पर्धा आहे. अजित आणि त्याच्या संघातील ड्रायव्हर फॅबियन डफीक्स, मॅथ्यू डेट्री (बेल्जियम) आणि कॅमेरॉन मॅक्लिओड (ऑस्ट्रेलिया) हे 992 क्लासमध्ये सहभागी होणार आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमार याचा रेसिंग दरम्यानचा व्हिडीओ अजित कुमार यांच्या टीमने शेअर केला आहे. मंगळवारी त्यांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कार बॅरिअरला धडकते आणि चार ते पाच वेळा गोल फिरताना दिसत आहे त्यामुळे या अपघातात कारचा चक्काचूर झाला. 180 च्या स्पीडने अजित कुमार रेसिंग करत असताना त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार बॅरिकेटला धडकली.

सुदैवाने अजित कुमार याला या अपघातात कुठलीही दुखापत झाली नाही आणि तो अपघात झालेल्या गाडीपासून दूर जाताना दिसत आहे. या अपघातात अभिनेत्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, या अपघातमुळे अभिनेता अजित कुमार याच्या चाहत्यांध्ये एकच खळबळ उडाली आहे. अजितने त्याच्या आगामी 'गुड बॅड अग्ली' चित्रपटातील त्याचे काम पूर्ण केले आहे. हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com