Akkalkot Accident : अक्कलकोट येथे कारचा भीषण अपघात, कारचालक गंभीर जखमी

सांगवी बुद्रुक येथे कारचा भीषण अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला आदळली. चालक गंभीर जखमी, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
Published by :
Team Lokshahi

अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथे कारचा भीषण अपघात झाला आहे. सांगवी बुद्रुक येथे ओमनी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला जाऊन आदळली ज्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघाती चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com