Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने सांगितला त्याच्या मुलीला आलेला वाईट अनुभव, नेमकं काय घडलं?
Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने सांगितला त्याच्या मुलीला आलेला वाईट अनुभव, नेमकं काय घडलं?Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने सांगितला त्याच्या मुलीला आलेला वाईट अनुभव, नेमकं काय घडलं?

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने सांगितला त्याच्या मुलीला आलेला वाईट अनुभव, नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची मुलगी नितारा कुमार हिला ऑनलाईन गेम खेळताना सायबर क्राईमचा अनुभव आला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Akshay Kumar Daughter Nitara Requested Private Photo Cyber Crime Video Game : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची मुलगी नितारा कुमार हिला ऑनलाईन गेम खेळताना सायबर क्राईमचा अनुभव आला आहे. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांची 13 वर्षीय लेक नितारा एका व्हिडीओ गेममध्ये अनोळखी व्यक्तींशी खेळत होती. या दरम्यान तिच्यासोबत चॅट सुरू झाले.

चर्चा करताना समोरच्या व्यक्तीने प्रथम ती कुठे राहते याबद्दल विचारलं. निताराने मुंबई असे उत्तर दिल्यानंतर पुढे तिचे लिंग विचारण्यात आले. तिने 'स्त्री' असल्याचे सांगितले असता, समोरील व्यक्तीने धक्कादायकपणे थेट न्यूड फोटो पाठव अशी मागणी केली. यानंतर नितारा तात्काळ सावध झाली. हा प्रकार सायबर गुन्ह्याचाच भाग असल्याचे अक्षय कुमारने स्पष्ट केले.

अक्षय कुमारची मुख्यमंत्र्यांना मागणी

या घटनेनंतर अक्षय कुमारने शाळांमध्ये सायबर शिक्षणाचा स्वतंत्र तास असावा, अशी मागणी केली आहे. त्याने म्हटले की, "शाळेत इतिहास, भूगोल, गणित शिकवले जाते. 2+2 = 4 शिकतो. पण सायबर क्राईमबाबतचे शून्य ज्ञान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत जागरूक करणं अत्यंत गरजेचं आहे." नितारा सध्या शालेय शिक्षण घेत असून ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर आहे. तरीही, तिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिच्या गोडपणामुळे ती नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com