Alia Bhatt : अलिया भट्टने लेकीसाठी उचललं टोकाचं पाऊल

Alia Bhatt : अलिया भट्टने लेकीसाठी उचललं टोकाचं पाऊल

अलिया भट्टने लेकीच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेतला. राहाचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरून काढण्याची मागणी केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

अभिनेत्री अलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लेकीने चाहत्यांना वेड लावले आहे. राहाच्या क्युट फोटोंना चाहत्याची खूप पसंती मिळत आहे. अलिया आणि रणबीर नेहमीच राहाचे गोड व्हिडिओ सोशल-मीडियावर पोस्ट करतात. अलिया आणि रणबीर अनेकवेळा अनेक कार्यक्रमांमध्ये लेकीबरोबर स्पॉट होतात. मात्र आता अलियाने एक मोठं पाऊल उचलले आहे. मुलीच्या सुरक्षिततेसाठी अलियाने हा निर्णय घेत असल्याचे समोर आले आहे.

अलियाने राहाचे सर्व फोटो सोशल-मीडियावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तसेच राहाचे सर्व व्हिडिओ आणि फोटो काढून टाकण्याची मागणी अलियाने माध्यमांना केली आहे. 15 जानेवारी 2025 रोजी रात्री 2 वाजता सैफ अली खानच्या राहत्या घरी त्याच्यावर चाकूहल्ला झाला होता. त्यानंतर अभिनेत्री करीना कपूर खानने देखील जेह आणि तैमूर याचे फोटो सोशल-मीडियावरुन काढण्याचा निर्णय घेतला होता. आता त्याच सुरक्षिततेच्या कारणावरुन अलियाने हा मोठा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच पालक म्हणूनही अलिया चांगली जबाबदारी पार पाडत आहे.

अलिया-रणबीर यांचा कामाबद्दल सागांयचे झाल्यास 'लव्ह ॲंड वॉर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटामध्ये अलिया- रणबीर याच्यासोबत विकी कौशलही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com